हिवाळ्यात फिरायच? महाराष्ट्रातील ही ठिकाण आहेत सर्वात बेस्ट
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये निसर्ग अतिशय सुंदर दिसत असतो. आपणही हिवाळ्यात फिरण्याचे नियोजन करत असाल तर महाराष्ट्रातील या ठिकाणी नक्की भेट द्या.
Maharashtra Dec 11 2024
Author: Jagdish Bobade Image Credits:Our own
Marathi
अलिबाग
अलिबाग हे समुद्र किनारी असणारे शहर आहे. येथे अलिबाग बीच, मांडवा बीच किंवा नागाव बीच आहे. येथे तुम्ही वॉटर स्पोर्टचाही आनंद घेऊ शकता.
Image credits: Getty
Marathi
ताडोबा
ताडोबा हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि जुने राष्ट्रीय उद्यान आहे. वाघ, हरीण, अस्वल, बिबट्या तसेच इतर प्राण्यांना बघण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करतात.
Image credits: Getty
Marathi
महाबळेश्वर
महाबळेश्वर हे पश्चिम घाटाच्या टेकड्यांमध्ये वसलेले आहे. हे ठिकाण थंड हवामानासाठी प्रसिद्ध आहे. महाबळेश्वर मध्ये घनदाट जंगले, तलाव व अनेक पॉईंट्स आहेत.
Image credits: Getty
Marathi
माथेरान
माथेरान हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते. माथेरान मध्ये सुर्योदय व सुर्यास्ताची दृश्य बघण्यासाठी लांबूनपर्यटक येतात.
Image credits: Getty
Marathi
भीमाशंकर
भीमाशंकर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर आहे. पुण्यापासून जवळ असलेले हे ठिकाण धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे. जंगले आणि डोंगरांनी भीमाशंकरला वेढलेले आहे.
Image credits: Getty
Marathi
पाचगणी
पाचगणी हे थंड हवामान, घनदाट जंगले, आणि निसर्गरम्य वातावरण यासाठी प्रसिद्ध आहे. पाचगणी येथील बाबा ब्राह्मण मंदिर, १२ डोळे आणि वाय टेबल हे बघण्यासारखे आहेत.
Image credits: Getty
Marathi
लोणावळा आणि खंडाळा
मुंबई आणि पुणे दरम्यान असलेली लोणावळा आणि खंडाळा ही दोन प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. लोणावळा आणि खंडाळ्यातील पर्वतीय दृश्य, धबधबे आणि घनदाट जंगले हे वेगळा अनुभव देतात.