बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांचा जन्म ६ जानेवारी १८१२ रोजी महराष्ट्रातील पोंभुर्ले येथे झाला. जांभेकर हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार होते.
'दर्पण' हे मराठीतले पहिले वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले. या दिवशी 'दर्पण' वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला.
बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस हा महाराष्ट्र सरकारतर्फे 'दर्पण दिन' अथवा 'वृत्तपत्र दिन' म्हणून साजरा केला जातो. हा दिवस दर वर्षी महाराष्ट्रात 'पत्रकार दिन' म्हणून साजरा होतो.
दर्पण हे बाळशास्त्रींच्या हातातील एक लोकशिक्षणाचे माध्यम होते. त्यांनी त्याचा उत्तम वापर प्रबोधनासाठी करून घेतला. भारतीय समाजातील अनिष्ट प्रथा बंद पडाव्यात अशी त्यांची भूमिका होती.
विधवा पुनर्विवाह, स्त्री-शिक्षण यांचा त्यांनी पुरस्कार केला. विधवा विवाहासाठीचा शास्त्रीय आधार शोधून काढण्याची कामगिरी त्यांनी केली. मे १८४६ मध्ये जांभेकर यांचा मृत्यू झाला.