Marathi

हिंदू नववर्ष कधी सुरू होईल? तारीख लक्षात ठेवा

Marathi

विक्रम संवत हे हिंदू नववर्ष आहे

प्रत्येक धर्माचे नव वर्ष वेगवेगळ्या इंग्रजी कॅलेंडरच्या तारखांना सुरू होते. हिंदूंच्या नवीन वर्षाला विक्रम संवत असे म्हणतात. जाणून घ्या 2025 मध्ये हिंदू नववर्ष कधी सुरू होईल.

Image credits: Getty
Marathi

या तारखेपासून सुरू होईल

ज्योतिषशास्त्रानुसार हिंदूंचे नव वर्ष चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होते. या दिवशी महाराष्ट्रात गुढीपाडवा, आसाममध्ये बिहू, तामिळनाडूमध्ये उगादी सण साजरा केला जातो.

Image credits: Getty
Marathi

30 मार्चपासून हिंदू नववर्ष सुरू होणार आहे

30 मार्चपासून हिंदू नववर्ष सुरू होणारय. चैत्र महिन्यात नवरात्र या दिवसापासून सुरू होणार आहे. हिंदू नववर्षाला विक्रम संवत असे म्हणतात. 30 मार्चपासून विक्रम संवत 2082 सुरू होणार आहे.

Image credits: Getty
Marathi

इंग्रजी कॅलेंडरच्या 57 वर्षे पुढे

इंग्रजी कॅलेंडरनुसार सध्या 2025 हे वर्ष सुरू आहे, तर हिंदू कॅलेंडरमध्ये 30 मार्चपासून 2082 हे वर्ष सुरू होणार आहे. हिंदू कॅलेंडर इंग्रजी कॅलेंडरपेक्षा 57 वर्षे पुढे आहे.

Image credits: Getty
Marathi

हिंदू नववर्षाचे महत्त्व

जेव्हा हिंदू नववर्ष सुरू होते, तेव्हा नवीन पाने आणि फुले झाडांवर आणि वनस्पतींवर दिसतात, जे निसर्गातील बदलाचे लक्षण आहे. हे बदल सकारात्मक असावेत, हेच हिंदू नववर्ष सांगतात.

Image credits: Getty

वेगाने वाढेल वजन, या 4 पद्धतीने करा डाळींचे सेवन

वहिनी बनेल फेव्हरिट बहुराणी, भूमीचे 7 Suit वाढवतील मान

कमी किंमत उच्च आराम!, ₹200 च्या खाली घ्या ट्रेंडी Crocs

Office मध्ये लावा स्टाइलचा तडका, घाला Yami Gautam सारख्या 6 साड्या