केसातील कोंडा कमी कसा करावा, घरगुती उपाय जाणून घ्या
Lifestyle Jan 19 2025
Author: vivek panmand Image Credits:freepik
Marathi
केसात कोंडा असणे हि सामान्य समस्या आहे
कोंड्याचा त्रास हा केसांच्या आरोग्यासाठी सामान्य समस्या आहे, परंतु योग्य उपाययोजना करून तो कमी करता येतो. कोंडा कमी करण्यासाठी घरगुती उपायांपासून ते बाजारात अनेक पर्याय आहेत.
Image credits: freepik
Marathi
नारळ तेल आणि लिंबाचा रस
नारळाच्या तेलात लिंबाचा रस मिसळा आणि केसांच्या मुळांवर मसाज करा. अर्धा तास ठेवल्यानंतर केस स्वच्छ धुवा. लिंबातील अँटीफंगल गुणधर्म कोंडा कमी करण्यास मदत करतात.
Image credits: freepik
Marathi
आलं (अदरक) आणि तुळशीचा रस
आलं किसून त्याचा रस काढा आणि त्यात तुळशीचा रस मिसळा. हे मिश्रण मुळांवर लावा. कोंडा कमी करण्यासाठी नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल उपाय आहे.
Image credits: chum darang/instagram
Marathi
दही
दही केसांच्या मुळांवर लावा आणि 30 मिनिटांनंतर धुवा. दह्यामुळे केसांना ओलावा मिळतो आणि कोंडा कमी होतो.
Image credits: chum darang/instagram
Marathi
अॅलोवेरा जेल
ताज्या अॅलोवेराचा जेल केसांच्या मुळांवर लावा आणि काही वेळ ठेवा. अॅलोवेरा खाज कमी करते आणि डोक्याची त्वचा स्वच्छ करते.
Image credits: chum darang/instagram
Marathi
लसूण
लसणाच्या दोन पाकळ्या कुटून त्याचा रस लावा. अर्ध्या तासानंतर धुवा. लसूण अँटीफंगल आहे, जो कोंड्याच्या समस्येला कमी करतो.