पाठीवर झोपल्याने घोरण्याची शक्यता वाढते. त्याऐवजी डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा. झोपताना डोक्याखाली उशा थोड्या उंच ठेवा, यामुळे श्वसन मार्ग मोकळा राहतो.
Image credits: Pinterest
Marathi
वजन नियंत्रणात ठेवा
जास्त वजन असल्यास घोरण्याची समस्या वाढते. नियमित व्यायाम व संतुलित आहाराने वजन कमी करा.
Image credits: Pinterest
Marathi
अल्कोहोल आणि तंबाखू टाळा
झोपण्याच्या आधी अल्कोहोल किंवा सिगारेटचे सेवन करू नये. हे श्वासमार्गातील स्नायूंना शिथिल करून घोरण्याची शक्यता वाढवतात.
Image credits: Pinterest
Marathi
झोपण्याच्या वेळा नियमित ठेवा
झोपेचा ठराविक वेळ ठेवा आणि दररोज समान वेळी झोपा व उठा. पुरेशी आणि शांत झोप मिळाल्यास घोरण्याची समस्या कमी होते.
Image credits: Pinterest
Marathi
हवेचा प्रवाह सुधारावा
खोलीत ह्यूमिडिफायर किंवा स्टीम इनहेलर वापरा, यामुळे नाक आणि घसा कोरडे होणार नाहीत. झोपण्यापूर्वी गरम पाण्याने गुळण्या कराव्यात, त्यामुळे घसा मोकळा राहतो.