मुंबईतील सर्वात प्रसिद्ध वडापाव कोणता आहे, माहिती जाणून घ्या
Lifestyle Feb 02 2025
Author: vivek panmand Image Credits:social media
Marathi
अशोक वडापाव तुम्हाला माहित आहे का?
मुंबई म्हटलं की वडापाव आठवलाच पाहिजे! आणि वडापावच्या जगात "अशोक वडापाव" हे नाव विशेष मानलं जातं. 1977 पासून चालू असलेल्या या स्टॉलने आपल्या खास चवीनं अनेकांना भुरळ घातली आहे.
Image credits: social media
Marathi
काय खास आहे अशोक वडापावमध्ये?
मसालेदार वडापाव – गरमागरम बटाट्याच्या भजीसह मऊ पाव आणि तिखट, गोड व लसूण चटणीचा एकदम बेस्ट कॉम्बिनेशन.
Image credits: social media
Marathi
खवय्यांना चुरा पाव आवडतो
चूरा पाव हा एक वेगळा प्रकार आहे, ज्यामध्ये तळलेल्या वड्याचा चुरा चटणीसोबत पावात भरून दिला जातो. हिरवी तिखट चटणी, गोड चिंचेची चटणी आणि लसूण चटणी या तीन चटण्या त्याला खास बनवतात.
Image credits: social media
Marathi
बॉलिवूड कलाकारांचे आवडते ठिकाण
अनेक सेलिब्रिटी आणि कॉलेज तरुणांचा येथे नेहमीच राबता असतो.
Image credits: social media
Marathi
याला एवढा मोठा क्रेझ का आहे?
अशोक वडापावने गेली ४५+ वर्षे चवीमध्ये सातत्य ठेवले आहे. लोकांच्या आवडीला जपून त्यांनी एक वेगळा ब्रँड तयार केला आहे. त्याचा खास मसाला आणि चटणी यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा आहे.
Image credits: social media
Marathi
हा वडापाव कोठे मिळतो?
प्रभादेवी येथे सकाळी ११ पासून रात्री ९ पर्यंत हा वडापाव मिळतो. आपण नक्कीच येथे जाऊन वडापावचा आस्वाद घेऊ शकता.