घरच्या घरी हॉटेलसारखा कडक चहा कसा बनवावा, प्रोसेस जाणून घ्या
Lifestyle Feb 02 2025
Author: vivek panmand Image Credits:Social media
Marathi
साहित्य
२ कप पाणी, १ कप दूध, २ टीस्पून चहा पावडर, २ टीस्पून साखर, १/२ टीस्पून आल्याचा रस, २-३ वेलदोडे, २-३ लवंगा, १ छोटा तुकडा दालचिनी
Image credits: Social media
Marathi
सुरुवातीला पाणी उकळून चहा पावडर उकळायला ठेवा
एका पातेल्यात २ कप पाणी उकळायला ठेवा. त्यात चहा पावडर आणि आले घालून मध्यम आचेवर ३-४ मिनिटे उकळा.
Image credits: social media
Marathi
चहात दूध टाकून रंग गडद होत नाही तोपर्यंत हलवत राहा
आता त्यात वेलदोडे, लवंगा आणि दालचिनी घालून अजून २ मिनिटे उकळा. नंतर त्यात दूध आणि साखर घालून मंद आचेवर ५-७ मिनिटे उकळा, जोपर्यंत चहा छान गडद रंगाचा होत नाही.
Image credits: Social media
Marathi
चहा जास्त उकळल्यावर चव चांगली लागते
चहा जितका जास्त उकळाल, तितका त्याचा स्वाद आणि कडकपणा वाढेल. शेवटी गाळून कपमध्ये ओता आणि गरमागरम सर्व्ह करा.
Image credits: Social media
Marathi
टीप
अधिक कडक चहा हवा असल्यास टी डस्ट आणि सामान्य चहा पावडर यांचे मिश्रण वापरा. चहा उकळताना ढवळत राहिल्यास चहा अधिक गडद आणि स्वादिष्ट होतो.