कोरियन डायट, पारंपारिक कोरियन खाद्यपदार्थांवर आधारित, वजन कमी करण्यास आणि त्वचा चांगली ठेवण्यास मदत करते. या आहारात ताज्या भाज्या, सीफूड, आणि फळांचा समावेश असतो.
फायबर समृद्ध भाज्या आणि सीफूड: कोरियन डायटमध्ये मुबलक प्रमाणात फायबर्स आणि सीफूडचा समावेश असतो. हे अन्न वजन कमी करण्यास आणि पचनसंस्थेला निरोगी ठेवण्यास मदत करते.
कोरियन डायटसोबत नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. यामुळे कॅलोरी बर्न होते आणि शरीर तंदुरुस्त राहते.
भूक नियंत्रित करण्यासाठी आहारात स्नॅक्सचे प्रमाण कमी करा. वजन वाढवायचे नसेल तर भूक नियंत्रण महत्वाचे आहे.
साखर, दुग्धजन्य पदार्थ आणि चरबीयुक्त पदार्थ कमी करा. भाज्या, भात, मांस आणि मासे अधिक खा. त्यामुळे तुम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी शरीर मिळेल.