लहानपणापासून मुलांना कोणत्या चांगल्या सवयी लावायला हव्यात?
Lifestyle Jan 26 2025
Author: vivek panmand Image Credits:Freepik
Marathi
स्वच्छतेची सवय
दात घासणे, हात धुणे, आंघोळ करणे यासारख्या स्वच्छतेच्या सवयी लहानपणापासून लावाव्यात. अन्न खाण्यापूर्वी आणि शौचालय वापरल्यानंतर हात धुण्याची सवय महत्त्वाची आहे.
Image credits: Freepik
Marathi
वेळेचं महत्त्व समजावणं
शाळेसाठी, अभ्यासासाठी, झोपण्यासाठी ठरलेल्या वेळा पाळण्याची सवय लावावी. वेळेच्या व्यवस्थापनाने मुले शिस्तबद्ध होतात.
Image credits: Freepik
Marathi
नम्रता आणि आदराची सवय
मोठ्यांशी आदराने बोलणे, इतरांच्या भावना ओळखणे आणि त्यांचा मान राखणे शिकवावं. "धन्यवाद," "क्षमस्व," आणि "कृपया" हे शब्द योग्य ठिकाणी वापरण्याची सवय लावावी.
Image credits: Freepik
Marathi
पुस्तक वाचनाची सवय
लहानपणीच मुलांना गोष्टींच्या आणि माहितीपूर्ण पुस्तकांच्या प्रेमात पाडा. वाचनामुळे त्यांची विचारशक्ती, भाषाशैली आणि ज्ञान वाढते.
Image credits: Freepik
Marathi
शारीरिक आरोग्याची सवय
रोज व्यायाम, योगा, किंवा मैदानी खेळ खेळण्याची सवय लावावी. फळे, भाज्या, आणि पोषणमूल्य असलेला आहार घेण्याचं महत्त्व समजावून द्यावं.