दिवस-रात्र मेहनत करूनही घरात बरकत नाहीये? किंवा कमावलेला पैसा टिकत नाहीये? तर वास्तूशास्त्रातील काही सोपे उपाय करून तुम्ही घरात सकारात्मक ऊर्जा आणि भरभराट आणू शकता.
Image credits: magicbricks
Marathi
घराची उत्तर दिशा मोकळी ठेवा
वास्तुशास्त्रानुसार, उत्तर दिशा ही धनाची दिशा मानली जाते. या दिशेला भंगार, तुटक्या वस्तू किंवा जड सामान ठेवल्यास आर्थिक अडचणी वाढू शकतात.
Image credits: magicbricks
Marathi
कुबेराचा फोटो किंवा मूर्ती लावा
घराच्या उत्तर दिशेला धनाची देवता कुबेर यांचा फोटो किंवा मूर्ती लावणं शुभ मानलं जातं. यामुळे घरात सुख-समृद्धी येते आणि पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतात.
Image credits: magicbricks
Marathi
घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा
घराचा मुख्य दरवाजा किंवा मेन डोरमधूनच सकारात्मक ऊर्जा घरात येते. त्यामुळे दरवाजाच्या आसपास घाण किंवा तुटलेल्या वस्तू ठेवल्यास घरात नकारात्मकता वाढू शकते.
Image credits: magicbricks
Marathi
तिजोरी योग्य दिशेला ठेवा
वास्तुशास्त्रानुसार, तिजोरी उत्तर किंवा ईशान्य (उत्तर-पूर्व) दिशेला ठेवणं शुभ मानलं जातं. यामुळे पैशांमध्ये स्थिरता येते आणि आर्थिक स्थिती मजबूत होते.
Image credits: magicbricks
Marathi
काचेच्या वाटीत समुद्री मीठ ठेवा
घरात सतत तणाव किंवा जडपणा जाणवत असेल, तर प्रत्येक खोलीत एका काचेच्या वाटीत समुद्री मीठ ठेवा. हे मीठ घरातली नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं आणि वातावरण हलकं करतं.