Valentines Day 2025 वेळी चेहऱ्यावर ग्लो हवाय? करा हे घरगुती उपाय
Lifestyle Feb 10 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
व्हेलेंटाइन डे साठी खास तयारी
व्हेलेंटाइन्स डे प्रत्येकासाठी खास असतो. या दिवशी पार्टनरसोबत खास वेळ घालवण्याचा प्लॅन केला जातो. अशातच महिला या दिवशी सुंदर दिसण्यासाठी मेकअप ते खास आउटफिट्स ट्राय करतात.
Image credits: social media
Marathi
स्किन केअर रुटीन महत्वाचे
व्हेलेंटाइन्स डे याआधी स्किन केअरकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे. तरच चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होईल. याबद्दलच पुढे जाणून घेऊया.
Image credits: social media
Marathi
गुलाब पाणी आणि काकडीचा पॅक
व्हेलेंटाइन डे वेळी चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी काकडी आणि गुलाब पाण्याचा पॅक लावू शकता. यामुळे चेहरा हायड्रेट राहण्यास मदत होईल.
Image credits: Social Media
Marathi
असा तयार करा पॅक
एका वाटीत काकडीचा रस घेऊन त्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करा. यानंतर चंदन पावडरही मिक्स करा. या सामग्रीची एक घट्च पेस्ट तयार करुन चेहऱ्याला 15 मिनिटे लावून ठेवा.
Image credits: social media
Marathi
संत्र्याची साल आणि मुल्तानी माती
चेहरा स्वच्छ होण्यासाठी मुल्तानी माती आणि संत्र्याच्या सालीचा वापर करू शकता. या दोन्ही गोष्टींमुळे त्वचेवरील टॅनिंग दूर होण्यास मदत होते.
Image credits: social media
Marathi
असा तयार करा पॅक
एका वाटीत संत्र्याची एक चमचा पावडर घेऊन त्यामध्ये दोन चमचे मुल्तानी माती मिक्स करा. यानंतर पाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला 10 मिनिटे लावल्यानंतर धुवा.
Image credits: social media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.