इडली स्टँडमध्ये पीठ ओतण्यापूर्वी, एक सुती कापड घ्या आणि ते ओले करा. इडली स्टँडच्या प्लेट्सवर ओले कापड ठेवा.
इडली स्टँड प्लेटमध्ये ओले कापड ठेवल्यानंतर त्यात इडलीचे पीठ घाला. पिठाचा आकार इडलीच्या आकारापेक्षा जास्त नसावा, उलट थोडा कमी ठेवावा, जेणेकरून फुगुन पिठ बाहेर येणार नाही.
ओल्या सुती कापडामुळे इडलीचे पीठ ताटाला चिटकत नाही, त्यामुळे इडली स्टँड व्यवस्थित आणि स्वच्छ राहते. तसेच भांडी धुतानाही सहज धुतली जातात.
इडली वाफवून तयार झाल्यावर सुती कापडामुळे प्लेटमधून इडली सहज निघून जाते. तसेच इडली तुटत नाही.
या हॅकमुळे, इडली स्टँड आणि प्लेट्स साफ करण्यासाठी कमी वेळ आणि मेहनत लागेल, त्यामुळे तुम्हाला भांडी धुण्यासाठी जास्त वेळ घालवावा लागणार नाही
ही पद्धत तुमचा वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाचवण्यास मदत करते, कारण इडली स्टँड आणि प्लेट्सची कमी साफसफाई करणे आवश्यक आहे.