चाणक्य नीतीनुसार विद्यार्थी असणे हा आपल्या संपूर्ण आयुष्यातील खूप खास काळ असतो. या काळात त्यांना आलेले अनुभव त्यांना त्यांचे भविष्य घडविण्यास मदत करतात. चाणक्याची यश सुत्रे जाणुयात
चाणक्यांच्या मते, विद्यार्थ्यांनी नेहमी त्यांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे आणि सर्व काम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण केले पाहिजे. असे केल्याने माणूस यशाचा मार्ग सुकर करू शकतो.
चाणक्य नीतीनुसार, विद्यार्थ्यांनी धैर्यवान बनले पाहिजे, कारण यामुळे व्यक्ती जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम असते. असे मानले जाते की संयम बाळगल्याने मानसिक आरोग्य सुधारते.
विद्यार्थ्यांनी रागावणे टाळावे, कारण यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान तर होतेच पण त्यांच्या मानसिक स्थितीवरही परिणाम होतो. चाणक्य नीतीनुसार क्रोध नेहमी नरकाचे दरवाजे उघडतो.
असे म्हणतात की जीवनातील संगतीचा माणसाच्या आयुष्यावर दीर्घकाळ प्रभाव पडतो, यातून व्यक्तीची विचारसरणी आणि स्वभाव ओळखता येतो, त्यामुळे माणसाने नेहमी चांगल्या संगतीत राहावे
चाणक्य नीतीनुसार, आळस माणसाची मानसिक आणि शारीरिक स्थिती खराब करू शकते आणि विद्यार्थ्यांनी ते टाळले पाहिजे. आळशी व्यक्ती इतरांपेक्षा मागे राहते.