झणझणीत अंडा मसाला करी रेसिपी, सोपी आणि झटपट बनवण्यासाठी.
Lifestyle May 21 2025
Author: Vijay Lad Image Credits:Pinterest
Marathi
अंडा मसाला करी, एक खास रेसिपी!
आज आपल्या डिशमध्ये एक नवा ट्विस्ट आणूयात! जेवणाची वेळ असो, अंडा मसाला करी एक उत्तम पर्याय आहे! तिखट, मसालेदार आणि चविष्ट, अगदी झटपट बनवता येणारी!
Image credits: Pinterest
Marathi
साहित्य
३-४ उकडलेली अंडी, कांदे, खोबरे, आले, लसूण, हळद, १ ते २ टिस्पून काश्मिरी तिखट, कडिपत्याची पाने, १ टिस्पून जीरे, १ ते २ तिखट मसाला, १ ते २ टिस्पून आगरी मसाला, कोथिंबिर, मीठ, तेल
Image credits: Pinterest
Marathi
अशी बनवा ‘अंडा मसाला करी’
उकडलेली अंडी घ्या आणि त्यांची साल काढून मधून कापून घ्या. यामुळे अंड्यांना मसाल्याचा चांगला फ्लेवर लागेल.
Image credits: Pinterest
Marathi
मसाल्याची फोडणी
कुकरमध्ये तेल गरम करा आणि त्यात हळद, तिखट फोडणी करा. त्यात अंडी घालून चांगले परतून काढून ठेवा.
Image credits: Pinterest
Marathi
वाटण तयार करा
कढईत कांदे, खोबरे, आले, लसूण, कोथिंबिर परतून थंड करा. हे मिक्सरमध्ये टाकून मऊ वाटण तयार करा.
Image credits: Pinterest
Marathi
कुकरमध्ये मसाले तयार करा
कुकरमध्ये तेल गरम करून जीरे, कडिपत्ता, ठेचलेला लसूण परता. त्यात काश्मिरी तिखट, लाल तिखट, आगरी मसाला घालून मसाला मिक्स करा.
Image credits: Pinterest
Marathi
अंडा मसाला करी सर्व्ह करा!
मसाल्यात अंडी घाला, गरम पाणी घालून २-४ उकळी काढा. नंतर कोथिंबिर टाकून गरम पोळ्या किंवा भातासोबत सर्व्ह करा!