तुम्हाला गोड खाणं पूर्णपणे बंद करायचं आहे का? मग या काही गोष्टींची नक्कीच मदत होईल. चला तर मग जाणून घेऊया.
सॉफ्ट ड्रिंक्स, कोला यांसारखी साखर असलेली सर्व प्रकारची पेय पूर्णपणे पिणं सोडा. यामुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
कोणतेही खाद्यपदार्थ विकत घेताना, त्यावरील लेबल नेहमी वाचा. त्यात कोणते घटक आहेत आणि साखरेचं प्रमाण किती आहे, हे समजून घ्या.
मिठाई किंवा गोड पदार्थ खाणं पूर्णपणे बंद करा. त्याऐवजी तुम्ही फळं खाऊ शकता. यामुळे शरीरात अतिरिक्त साखर जात नाही.
चहा आणि कॉफीमध्ये साखरेऐवजी जायफळ (Nutmeg), हेझलनट (Hazelnut) किंवा दालचिनी (Cinnamon) वापरू शकता. यामुळे चवही येते आणि आरोग्यही चांगलं राहतं.
बिस्किट, चिप्स यांसारखे स्नॅक्स खाणं टाळा. त्याऐवजी तुमच्या आहारात नट्स (Nuts) आणि सीड्स (Seeds) यांचा समावेश करा.
नेहमी ठराविक वेळेवर जेवण्याची सवय लावा. यामुळे गोड खाण्याची इच्छा आणि अवेळी लागणारी भूक नियंत्रणात राहते.
जर कुणी तुम्हाला मिठाई किंवा गोड पदार्थ देत असेल, तर 'नाही' म्हणायला अजिबात संकोच करू नका. या सवयीमुळे अतिरिक्त साखर खाणं टाळता येतं.
Bangle Designs : हातांचं सौंदर्य वाढवणाऱ्या बांगड्या... एकाहून एक सुंदर डिझाइन्स, नक्की ट्राय करा
फ्रिजशिवाय अंडी ३० दिवस ताजी कशी ठेवायची? जाणून घ्या सोप्या टिप्स
डेली वेअरसाठी मंगळसूत्र ब्रेसलेट्स, पाहा लेटेस्ट डिझाइन्स
Vastu Tips : घरात ठेवा या 7 पवित्र वस्तू, लक्ष्मी स्वतःहून चालून येईल!