Marathi

बटाटा - एक नैसर्गिक सौंदर्यप्रसाधन

कच्च्या बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडंट आणि 'कॅटेकोलेझ' नावाचं एक एन्झाइम असतं. हे घटक चेहऱ्यावरचे काळे डाग आणि पिग्मेंटेशन कमी करायला मदत करतात.

Marathi

असा करा थेट वापर

बटाट्याचे पातळ काप करा. त्यावर थोडं पाणी किंवा गुलाबजल शिंपडा. डाग असलेल्या ठिकाणी ५-७ मिनिटं हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर १५ मिनिटं तसंच ठेवून थंड पाण्याने चेहरा धुवा.

Image credits: instagram
Marathi

बटाटा आणि लिंबाचा रस

पिग्मेंटेशन लवकर कमी करण्यासाठी बेस्ट उपाय आहे. २ चमचे बटाट्याच्या रसात १ चमचा लिंबाचा रस मिसळा. कापसाने हा पॅक लावा. लिंबामधील नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्मामुळे चेहऱ्याला चमक येते.

Image credits: Pixabay
Marathi

बटाटा आणि मध

तुमची त्वचा कोरडी असेल, तर २ चमचे बटाट्याच्या रसात १ चमचा मध मिसळून फेस पॅक बनवा. हा पॅक चेहरा आणि मानेला लावून २० मिनिटांनी धुवा. यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो.

Image credits: Getty
Marathi

बटाटा आणि दही

१ चमचा बटाट्याची पेस्ट आणि १ चमचा ताजं दही एकत्र करून मास्क तयार करा. दह्यामधील लॅक्टिक ॲसिड त्वचेवरील मृत पेशी (Dead Cells) काढून टाकतं आणि बटाटा चेहऱ्यावरचे डाग कमी करतो.

Image credits: Pixabay
Marathi

ही गोष्ट लक्षात ठेवा

तुमची त्वचा खूप संवेदनशील (Sensitive Skin) असेल, तर लिंबाचा रस वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा. चांगल्या परिणामांसाठी हे घरगुती उपाय आठवड्यातून किमान दोनदा करून बघा.

Image credits: Getty

10 ग्रॅमपेक्षा कमी वजनात सोन्याचे ब्रेसलेट! पाहा काही हटके डिझाइन्स

Gold Bracelet : 10 ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट्स, पाहा लेटेस्ट डिझाइन्स

स्वतःचा बिझनेस सुरू करताय? मग या ५ गोष्टी आधीच जाणून घ्या

Mood Boosting Habits : फक्त ६० सेकंदात तुमचा मूड सुधारतील या १० सोप्या सवयी, रोज नक्की करा