Marathi

Pulao Tips : पुलाव मोकळा सळसळीत होत नाही? या सोप्या टिप्स वापरून पाहा!

Marathi

Pulao Tips: पुलाव मोकळा सळसळीत होत नाही? या टिप्स वापरून पाहा!

पुलाव बनवताना तो चिकट होऊ नये आणि भाताचा प्रत्येक दाणा मोकळा राहावा यासाठी काही सोप्या टिप्स आहेत. लिंबाचा रस हा त्यापैकीच एक महत्त्वाचा घटक आहे.
Image credits: Getty
Marathi

तुमचा पुलाव पण चिकट होतो का?

पुलाव किंवा बिर्याणी बनवताना भात जास्त शिजून त्याचा गोळा होतो, अशी तुमचीही तक्रार आहे का? काळजी करू नका, या सोप्या टिप्स तुमच्यासाठीच आहेत.

Image credits: Getty
Marathi

तांदूळ भिजवायला विसरू नका

पुलाव बनवण्यापूर्वी किमान २० मिनिटे तांदूळ भिजवून ठेवा. असं केल्यामुळे तांदळाचा दाणा लांब आणि सडपातळ होतो, ज्यामुळे पुलाव मोकळा होतो.
Image credits: AI
Marathi

थंड पाणी अजिबात वापरू नका!

पुलावसाठी तांदूळ शिजवताना थंड पाणी कधीच वापरू नका. त्याऐवजी, नेहमी उकळलेलं गरम पाणीच वापरा. यामुळे भात व्यवस्थित शिजतो.
Image credits: Getty
Marathi

मोकळा पुलाव बनवण्यासाठी ही आहे ट्रिक

गरम पाणी वापरल्यामुळे तांदळाचे दाणे एकमेकांना चिकटत नाहीत आणि भात मोकळा शिजतो. पाणी उकळताना त्यात थोडा लिंबाचा रस किंवा तेल टाकल्यास भाताचे शीत एकमेकांना चिकटणार नाही.

Image credits: Getty
Marathi

आता बनवा परफेक्ट पुलाव!

या सोप्या टिप्स वापरून बघा. तुम्ही जरी पहिल्यांदाच बनवत असाल, तरीही तुमचा पुलाव एकदम हॉटेलसारखा मोकळा आणि चविष्ट होईल.

Image credits: Getty

Pearl Ring : हातांचं सौंदर्य वाढवणाऱ्या मोत्याच्या अंगठ्या, पाहा खास डिझाइन्स

Pressure Cooker : कुकरमधून पाणी बाहेर येतंय? या सोप्या टिप्स फॉलो करा

घरात दोन झाडू एकत्र ठेवल्यास काय होतं? जाणून घ्या वास्तुशास्त्राचे नियम

पायांचे खुलेल सौंदर्य, गणपतीत ट्राय करा या डिझाइन्सचे पैंजण