Marathi

सगळीकडे भेसळच भेसळ

आजकाल प्रत्येक गोष्टीत भेसळ सर्रास झाली आहे. पैशांसाठी लोकांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार वाढले आहेत. मग अशावेळी, काही पदार्थांमधील भेसळ कशी ओळखायची, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Marathi

नकली पनीर कसं ओळखायचं?

गरम तव्यावर पनीरचा एक तुकडा ठेवा. जर तो जळून काळा पडला, तर समजा पनीर नकली आहे. पण जर तो ब्राऊन रंगाचा झाला, तर ते खरं पनीर आहे.

Image credits: ferofactz Instagram
Marathi

तांदळाची शुद्धता अशी तपासा

तांदळातही प्लास्टिकची भेसळ केली जाते. हे ओळखणं सोपं आहे. एका तांदळाचा दाणा मेणबत्तीच्या ज्योतीवर चिमट्याने धरा. जर त्याने पेट घेतला आणि तो काळा झाला, तर तो प्लास्टिकचा तांदूळ आहे.

Image credits: ferofactz Instagram
Marathi

आइस्क्रीममध्ये भेसळ?

तुमच्या आइस्क्रीममध्ये केमिकल आहे का, हे पाहण्यासाठी त्यावर थोडा लिंबाचा रस टाका. रस टाकल्यावर जर फेस आला, तर समजा आइस्क्रीममध्ये केमिकल मिसळलेलं आहे.

Image credits: ferofactz Instagram
Marathi

कलिंगडात केमिकल?

कलिंगडाची एक फोड पाण्यात टाका. जर पाण्याला रंग सुटला, तर त्यात केमिकल मिसळले आहे, असं समजा. शुद्ध कलिंगड पाण्यात रंग सोडत नाही.

Image credits: ferofactz Instagram
Marathi

मधाची 'रिॲलिटी' टेस्ट

एका पाण्याच्या ग्लासमध्ये मधाचा एक थेंब टाका. जर मध शुद्ध असेल, तर तो थेंब थेट पाण्याच्या तळाशी जाऊन बसेल. पण जर मध नकली असेल, तर तो पाण्यात विरघळेल आणि पाण्याला रंग येईल.

Image credits: ferofactz Instagram

Cut Sugar : आहारातून साखर कमी करायचीय? मग या स्मार्ट टिप्स नक्की फॉलो करा

Bangle Designs : हातांचं सौंदर्य वाढवणाऱ्या बांगड्या... एकाहून एक सुंदर डिझाइन्स, नक्की ट्राय करा

फ्रिजशिवाय अंडी ३० दिवस ताजी कशी ठेवायची? जाणून घ्या सोप्या टिप्स

डेली वेअरसाठी मंगळसूत्र ब्रेसलेट्स, पाहा लेटेस्ट डिझाइन्स