आजही बहुतांश महिला ऑफिस किंवा सणासुदीला सिल्क साडी नेसणे पसंत करतात. सिल्क साडी नेसल्याने रॉयल लूक येतो.
सिल्तक साडी व्यवस्थितीत ठेवल्यास त्याची चमक 100 वर्षांपर्यंत टिकून राहू शकते. यासाठी घरच्याघरी सिल्क साडी धुवायची कशी हे पुढे पाहूया.
सिल्क साडी चार ते पाच वेळा नेसल्यानंतर धुवावी. साडी धुण्याआधी त्यावरील लेबल नक्की वाचा. कारण साबणाने साडी धुतल्यास त्याची चमक निघून जाऊ शकते.
सिल्क साडी धुण्यासाठी नेहमीच थंड पाण्याचा वापर करावा. साडी धुण्यापूर्वी काही तास थंड पाण्यात भिजवून ठेवावी. गरम पाण्याचा वापर केल्यास साडीचा रंग खराब होऊ शकतो.
साडी भिजवल्यानंतर बादलीत पाणी घेऊन त्यामध्ये दोन चमचे व्हिनेगर मिक्स करा. यानंतर साडी पाण्यात दहा मिनिटे बुडवून ठेवा. यामुळे साडीला लागलेले डागही निघून जातील.
धुतल्यानंतर साडी घट्ट पिळू नका. सुकण्यासाठी साडी उन्हात देखील ठेवू नका. सावलीमध्ये साडी सुकवा.
रेशमी साडी प्लेन साडीसोबत कधीच ठेवू नये. अशा साड्या वेगळ्या ठिकाणी ठेवाव्यात. सुती कापडात साडी गुंडाळून ठेवावी.