Valentines Day ला चेहऱ्यावर येईल गुलाबी, Rose Water ने असे करा फेशियल
Lifestyle Feb 11 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Freepik
Marathi
नॅच्युरल ग्लो साठी गुलाब पाणी
व्हेलेंटाइन वेळी महिला खास तयारी करतात. अशातच घरच्याघरी फेशियल करण्याचा विचार करत असाल तर गुलाब पाण्याचा वापर करु शकता. यामुळे त्वचेला नैसर्गिकरित्या गुलाबी येण्यास मदत होईल.
Image credits: Social media
Marathi
चेहरा स्वच्छ धुवा
फेशियल करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यानंतर कॉटन बॉल्स गुलाब पाण्यात बुडवून चेहरा पुसून घ्या.
Image credits: pinterest
Marathi
स्क्रब तयार करा
गुलाबाच्या पाण्याने चेहरा स्वच्छ केल्यानंतर एक स्क्रब तयार करा. यासाठी गुलाबाच्या पाकळ्या वाटून घ्या. यामध्ये साखर आणि मध मिक्स करा.
Image credits: social media
Marathi
फेस स्क्रब करा
मिश्रण तयार केल्यानंतर स्क्रब चेहऱ्यावर 2-3 मिनिटांपर्यंत ठेवून धुवा.
Image credits: freepik
Marathi
फेस मसाज क्रिम
एका वाटीमध्ये 1 चमचे गुलाब, अर्धा चमचा मध आणि एक चमचा एलोवेरा जेल मिक्स करुन चेहऱ्याला लावा.
Image credits: pexels
Marathi
मसाज किती वेळ करावा?
9-10 मिनिटे चेहऱ्याला मसाज करावा. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. शेवटी फेस पॅक तयार करा. यासाठी एका वाटीत एक चमचा चंदन पावडर आणि गुलाब पाणी मिक्स करा.
Image credits: freepik
Marathi
फेसपॅक लावा
चंदन पावडर आणि गुलाब पाण्याचा फेसपॅक चेहऱ्याला 10 मिनिटे लावून ठेवा. यानंतर चेहरा स्वच्छ धुवा.
Image credits: freepik
Marathi
चेहऱ्याला येईल पिंक ग्लो
गुलाब पाण्याने फेशियल केल्याने चेहऱ्याला नैसर्गिक गुलाबी येण्यास मदत होईल. याशिवाय त्वचा मॉइश्चराइज आणि फ्रेश होईल.