कुकरमध्ये २ चमचे तेल गरम करा. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि आले-लसूण पेस्ट टाकून सोनेरी रंगावर परतून घ्या. त्यानंतर टोमॅटो टाका आणि ते मऊ होईपर्यंत शिजवा.
Image credits: Gemini AI
Marathi
चिकन आणि मसाल्यांचे मिश्रण
आता स्वच्छ धुतलेले चिकनचे तुकडे कुकरमध्ये टाका. त्यात हळद, लाल तिखट, धणे पावडर, गरम मसाला आणि मीठ टाकून चांगले मिक्स करा. तेलात २ मिनिटे चांगले परतून घ्या.
Image credits: Gemini AI
Marathi
फक्त २ शिट्ट्या आणि चिकन तयार!
अर्धा ग्लास पाणी ओता, कुकरचे झाकण लावा आणि दोन शिट्ट्या होऊ द्या. बस्स! अवघ्या १० मिनिटांत वाटण न वाटता तुमची गरमागरम चिकन ग्रेव्ही तयार आहे!