दूध एक-दोन दिवस न वापरल्यास त्याचा PH स्तर कमी होत त्यामध्ये रासायनिक प्रक्रिया घडण्यास सुरुवात होते. याशिवाय दूध गरम न करता ठेवल्यास त्यामध्ये विषाणू निर्माण होण्यास सुरुवात होते.
दूध तापवण्यासाठी स्वच्छ भांड्याचा वापर करावा. यानंतरच दूध गरम करावे.
दोन दिवसांपूर्वीचे दूध असल्यास एकदा उकळवून ठेवल्यास ते फाटले जाईल. यामुळे कमीत कमी तीन ते चार वेळा दूध उकळवा.
दूध उकळल्यानंतर झाकून ठेवू नका. त्यावर छिद्र असणारे झाकण ठेवू शकता. अन्यथा दूधात बॅक्टेरिया तयार होऊ लागतात.
दूध उकळवताना त्यामध्ये चिमुटभर कॉर्न स्टार्च मिक्स करा.
दूध फाटण्यापासून दूर रहायचे असल्यास गरम करताना त्यामध्ये चिमूटभर बेकिंग सोडा मिक्स करा.
दूध उकळल्यानंतर त्याचे तापमान सामान्य झाल्यानंतरच फ्रिजमध्ये ठेवा.
दूध गरम केल्यानंतर फ्रिजमध्ये त्याच्या बाजूला टोमॅटो, चटणीस लिंबू अशा अॅसिडिक वस्तू ठेवणे टाळा. यामुळे दूध लवकर फाटले जाते.