चेहऱ्यावरील काळे डाग, सुरकुत्या होतील गायब; असा वापरा Oats Face Pack
Lifestyle Oct 27 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Getty
Marathi
ओट्स फेस पॅक
चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि मुरुमे दूर करण्यासाठी ओट्सचे फेस पॅक वापरणे चांगले आहे. ओट्समधील अँटीऑक्सिडंट्स चेहऱ्यावरील सुरकुत्या रोखण्यास आणि कोलेजनचे उत्पादन वाढविण्यात मदत करतात.
Image credits: Freepik
Marathi
ओट्स- दही
दोन चमचे ओट्स, एक चमचा दही आणि एक चमचा मध एकत्र करून चेहऱ्यावर लावा. २० मिनिटांनी धुवा.
Image credits: Freepik
Marathi
ओट्स- ऑलिव्ह ऑइल
दोन चमचे ओट्समध्ये एक चमचा मध आणि एक चमचा ऑलिव्ह ऑइल मिसळून चेहऱ्यावर लावा आणि मसाज करा. २० मिनिटांनी धुवा.
Image credits: Getty
Marathi
ओट्स- हळद
दोन चमचे ओट्समध्ये अर्धा चमचा हळद आणि थोडे पाणी घालून मिश्रण तयार करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनी धुवा.
Image credits: Freepik
Marathi
ओट्स- पपई
पिकलेल्या पपईच्या गरमध्ये दोन चमचे ओट्स आणि एक चमचा बदाम तेल घालून मिश्रण तयार करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनी धुवा.
Image credits: Getty
Marathi
ओट्स- कोरफड जेल
एक चमचा कोरफड जेल आणि दोन चमचे ओट्स एकत्र करून मिश्रण तयार करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. अर्ध्या तासानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.
Image credits: Getty
Marathi
Disclaimer :
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.