Marathi

मुंबईत स्वस्तात मस्त खरेदी करण्यासाठी 10 प्रसिद्ध मार्केट

Marathi

कॉफ्रर्ड मार्केट, फोर्ट

क्रॉफर्ड मार्केटमध्ये फळं, भाज्या आणि होलसेल दरात सणउत्सावासाठी लागणारे साहित्य खरेदी करता येते.

Image credits: Facebook
Marathi

चोर बाझार, कुंभारवाडा

घरासाठी किंवा रेस्टॉरंटसाठी विंटेज वस्तू किंवा शोपीस घेण्यासाठी सर्वाधिक प्रसिद्ध अशा चोर बाझारला नक्की भेट देऊ शकता. येथे जुन्या काळातील दुर्मिळ अशा वस्तूही खरेदी करता येतात.

Image credits: Facebook
Marathi

झेवरी बाझार, भुलेश्वर

सोन्या-चांदीच्या ज्वेलरी खरेदी करण्यासाठी मुंबईतील एकमेव ठिकाण झवेरी बाझार आहे. येथे वेगवेगळ्या डिझाइनमधील ट्रेन्डी ज्वेलरी तुम्हाला खरेदी करता येईल.

Image credits: Facebook
Marathi

लिंकींग रोड, वांद्रे

ट्रेन्डी आउटफिट्स, बॅग्स, चप्पल शूजसारख्या वस्तू कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी नक्कीच मुंबईतील लिंकींग रोडला भेट द्या.

Image credits: Instagram
Marathi

कुलाबा कॉजवे, कुलाबा

फॅशनेबल आउटफिट्स, बॅग्स, ज्वेलरी आणि अँटिक वस्तू घेण्यासाठी कुलाबा कॉजवेचे मार्केट प्रसिद्ध आहे.

Image credits: Facebook
Marathi

हिल रोड, वांद्रे

खिशाला परवडणाऱ्या आणि स्वस्त दरात ट्रेन्डी, फॅशनेबल कपडे खरेदी करण्यासाठी हिल रोड बेस्ट आहे.

Image credits: Instagram
Marathi

लालबाग मार्केट, लालबाग

मुंबईत मसाल्यांसाठी प्रसिद्ध असे लालबाग मार्केट आहे. येथे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले तयार करुन दिले जातात.

Image credits: facebook
Marathi

हिरा पन्ना मार्केट, ताडदेव

ताडदेव येथे असणाऱ्या हिरा पन्ना मार्केटमध्ये ब्रँडेड आउटफिट्स आणि परफ्यूम खरेदी करता येतील.

Image credits: social media
Marathi

अर्बन हाट, नवी मुंबई

घराच्या सजावटीसाठी हँडक्राफ्ट आणि डेकोर वस्तू खरेदी करण्यासाठी अर्बन हाटला भेट देऊ शकता.

Image credits: social media
Marathi

लोखंडवाला मार्केट, अंधेरी पश्चिम

ट्रेन्डी फूटवेअर आणि कपड्यांसाठी लोखंडवाला मार्केट प्रसिद्ध आहे.

Image Credits: social media