मोक्षदा एकादशीला करा हे 5 उपाय, संकटं दुरूनच परत जातील
Lifestyle Nov 30 2025
Author: Rameshwar Gavhane Image Credits:Getty
Marathi
कधी आहे मोक्षदा एकादशी 2025?
1 डिसेंबर, सोमवारी मोक्षदा एकादशीचे व्रत केले जाईल. या दिवशी काही सोपे उपाय केल्याने तुमच्या अडचणी दूर होऊ शकतात. पुढे जाणून घ्या अशाच 5 सोप्या उपायांबद्दल...
Image credits: Getty
Marathi
भगवान विष्णूंची पूजा करा
एकादशीला मुख्यत्वे भगवान विष्णूंची पूजा केली जाते. या दिवशी विष्णूंना पिवळे वस्त्र अर्पण करा. पिवळ्या फळांचा नैवेद्य दाखवा आणि मंत्रांचा जपही करा.
Image credits: Getty
Marathi
घरावर लावा केशरी ध्वज
एकादशी तिथीला आपल्या घराच्या छतावर केशरी रंगाचा ध्वज लावा. असे केल्याने सर्व देवतांची कृपा तुमच्यावर राहील आणि येणारी संकटं टळतील.
Image credits: Getty
Marathi
या वस्तूंचे दान करा
एकादशी तिथीला दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी गरजूंना भोजन, धान्य, पिवळी फळे, पिवळी वस्त्रे, चपला-बूट इत्यादी वस्तूंचे दान करावे.
Image credits: Getty
Marathi
केळीच्या झाडाची पूजा करा
एकादशी तिथीला केळीच्या झाडाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, हे केल्याने लव्ह लाईफ आनंदी राहते आणि ज्यांचे लग्न होत नाही, त्यांची इच्छा पूर्ण होते.
Image credits: Getty
Marathi
विष्णु सहस्रनामाचा पाठ करा
मोक्षदा एकादशीला विष्णु सहस्रनामाचा पाठ करा. हा एक अतिशय अचूक आणि सोपा उपाय आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंद टिकून राहील आणि वाईट दिवस टळतील.