मुंबईतील 'या' ठिकाणी मिळतो क्वालिटी वडापाव, खाऊन म्हणाल वाह!
आपण मुंबईत आल्यावर वडापावची आठवण येत असेल. यावेळी वडापाव खायची आपल्याला आठवण येत असेल, अशावेळी आपण जाणून घेऊयात कि इथं कोणती ठिकाण प्रसिद्ध आहेत.
Lifestyle Nov 30 2025
Author: vivek panmand Image Credits:social media
Marathi
आनंद वडापाव (विलेपार्ले)
मुंबईतील प्रसिद्ध वडापाव म्हणून आनंद वडापाव हा प्रसिद्ध आहे. हा वडापाव विलेपार्ले येथे असून या ठिकाणी असून येथे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.
Image credits: social media
Marathi
कीर्ती कॉलेज वडापाव (दादर)
कीर्ती वडापाव हा दादर येथील प्रसिद्ध असून या ठिकाणी कॉलेज स्टुडन्टची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. या ठिकाणचा वडापाव मोठा आणि कुरकुरीत आहे.
Image credits: social media
Marathi
B.E.S.T वडापाव (लालबाग)
बेस्ट वडापाव हा डेपोजवळ मिळत असून याठिकाणी ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. स्वस्त दारात आपण येथील वडापावचा आनंद घेऊ शकता. लालबाग येथे हा वडापाव प्रचंड लोकप्रिय आहे.
Image credits: social media
Marathi
गजानन वडापाव (ठाणे)
गजानन वडापाव हा सॉफ्ट पाव आणि क्लासिक चटणीसोबत मिळतो. साधी पण लाजवाब चव असल्यामुळं या ठिकाणी गर्दी असते. गिरगाव येथील हा वडापाव प्रचंड लोकप्रिय आहे.
Image credits: social media
Marathi
चंदू वडापाव (ठाणे)
चंदू वडापाव हा ठाण्याचा ब्रँडेड वडापाव असून ठाणे येथील तो प्रसिद्ध आहे. हा वडापाव परफेक्ट साईजमध्ये मिळत असून या ठिकाणी कामगारांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.