लाल बहादुर शास्री यांचा जन्म लाल बहादुर श्रीवास्तवच्या रुपात झाला होता. पण जाती व्यवस्थेला विरोध करण्यासाठी आपले उपनाम सोडण्याचा निर्णय घेतला होता.
बालपणी लाल बहादुर शास्री यांना नन्हे म्हणून संबोधले जायचे.
देशाचे दुसरे पंतप्रधान शास्री यांच्याकडे चप्पल खरेदी करण्याचे पैसे नव्हे. यामुळे कडक उन्हातही लाल बहादुर शास्री अनवाणी चालत जायचे.
वयाच्या 16 व्या वर्षीच लाल बहादुर शास्रींनी महात्मा गांधी यांच्या असहयोग आंदोलनात सहभागी झाले.
वर्ष 1927 मध्ये लाल बहादुर शास्री यांनी मिर्जापुरमधील ललिता देवी यांच्यासोबत विवाह केला. यावेळी हुंड्यात शास्री यांनी एक चरखा आणि लहान विणलेला कापड घेतला होता.
काशी विद्यापीठातून पदवी संपन्न केल्यानंतर लाल बहादुर यांना 'शास्री' उपाधि दिली गेली.
लाल बहादुर शास्री यांनी कार खरेदी करण्यासाठी 5 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.
वर्ष 1947 मध्ये शास्री यांनी पोलीस आणि परिवहन मंत्रीच्या रुपात महिलांना बस कंडक्टरच्या रुपात नियुक्त करण्याचा निर्णय घेतला होता.
संपूर्ण आयुष्यात शास्री यांनी इंग्रजांच्या शासनाविरोधात काही धाडसी अभियान चालवले आणि सात वर्षे तुरुंगाची शिक्षा भोगली.
वर्ष 1966 मध्ये शास्री यांना भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.