Janhvi Kapoor च्या चमकदार केसांचे सीक्रेट, लावा हा खास हेअर मास्क
Lifestyle Mar 22 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
चमकदार केसांचे सीक्रेट
जान्हवी कपूर आपल्या चमकदार केसांसाठी महागडे प्रोडक्ट्स नव्हे तर घरच्याघरी तयार केलेला हेअर मास्क लावते.
Image credits: Instagram
Marathi
हेअर केअर रुटीन
जान्हवीने एका व्हिडीओच्या मदतीने, हेअर केअर रुटीन शेअर केले आहे. जान्हवी केसांच्या मूळांची काळजी घेण्यासाठी ऑलिव्ह ऑइलने मसाज करते. यामुळे ब्लड सर्कुलेशन सुधारले जाते.
Image credits: Instagram
Marathi
हेअर पॅक
सिल्की आणि चमकदार केसांसाठी जान्हवी कपूर एक खास हेअर मास्क लावते. यामध्ये योगर्ट, मध, अंड आणि नारळाचे दूध वापरते.
Image credits: instagram
Marathi
असा तयार करा हेअर पॅक
हेअर पॅक तयार करण्यासाठी 4 चमचे योगर्ट, 2 चमचे मध, 1 अंड, 2 चमचे नारळाचे दूध मिक्स करुन घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांच्या मूळांना लावा.
Image credits: instagram
Marathi
असा लावा हेअर पॅक
हेअर मास्क सुकल्यानंतर सामान्य थंड पाण्याचा वापर करा. यामुळे केसांना चमक येईल.
Image credits: Instagram
Marathi
दह्याचे फायदे
दह्यामधील लॅक्टिक अॅसिड केसांच्या मूळांमधील घाण आणि अतिरिक्त तेल दूर करते. यामुळे केसांची मूळ मजबूत होण्यासह केस गळतीची समस्या कमी होते.
Image credits: Social Media
Marathi
मधाचे फायदे
मध नैसर्गिक कंडीशनर प्रमाणे काम करते. केसांना पोषण देण्यासह ओलसरपणा टिकवून ठेवते.
Image credits: Social media
Marathi
अंड्याचे फायदे
अंडी केसांमधील अतिरिक्त तेल आणि घाण दूर करण्यास मदत करके. यामुळे केस धुतल्यानंतर चिकट जाणवत नाही.
Image credits: Freepik
Marathi
नारळाचे दूध
नारळाचे दूध केसांना चमक आणण्यास मदत करते. याशिवाय केसांचे टेक्चरही सुधारले जाते.