थंड हवा, कमी आर्द्रता आणि गरम पाण्याचा वापर यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो. त्यामुळे त्वचा कोरडी, ताणलेली आणि निस्तेज दिसू लागते.
हिवाळ्यात फार कडक फेसवॉश टाळा. माइल्ड, मॉइश्चरायझिंग फेसवॉशने दिवसातून 2 वेळा चेहरा धुवा. गरम पाण्याऐवजी कोमट पाणी वापरणे जास्त फायदेशीर ठरते.
आंघोळीनंतर लगेच मॉइश्चरायझर लावा. अॅलोवेरा, शिया बटर किंवा नारळ तेल असलेले क्रीम वापरल्यास त्वचा मऊ राहते. रात्री झोपण्यापूर्वी फेस क्रीम लावणे विसरू नका.
ओठ फुटू नयेत म्हणून लिप बाम वापरा. हातांसाठी जाड क्रीम किंवा ग्लिसरीन वापरा. रात्री हातांना क्रीम लावून सुती हातमोजे घातल्यास फायदा होतो.
हिवाळ्यात तहान कमी लागते, पण पाणी भरपूर प्या. आहारात फळे, भाज्या, सुकामेवा आणि तूप/तेल यांचा समावेश ठेवा. यामुळे त्वचा आतून निरोगी राहते.
हातावर काढा पतंगासारखी मेहंदी, संक्रांतिला कोणती काढाल मेहंदी?
पायांची नजाकत सिंगल पीसमध्ये, वन चेन सिल्व्हर अँकलेट डिझाइन्स
केसांना वळवून बनवा फॅन्सी हेअरस्टाईल, रॅप्ड पोनीटेलचे होईल कौतुक
हल्ली 'या' ब्लाउज डिझाइन्सचा आहे ट्रेन्ड; शिक्षिकांसाठी ७ सुंदर & डिसेंट ऑप्शन्स