Marathi

Monsoon Face Care: पावसाळ्यात चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी?

Marathi

चेहरा दररोज २ वेळा स्वच्छ धुवा

पावसाळ्यात हवेत आर्द्रता अधिक असते, त्यामुळे चेहऱ्यावर तेल, धूळ आणि घाम जमा होतो. यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण साचते आणि पिंपल्स होऊ शकतात. 

Image credits: pinterest
Marathi

टोनरचा वापर करा

पावसात ओपन पोअर्सचा त्रास अधिक होतो. टोनर वापरल्यानं छिद्रं बंद राहतात आणि चेहरा टवटवीत दिसतो. ऑलिव्ह ऑइल किंवा गुलाबपाणी यासारखे नैसर्गिक टोनरही वापरू शकता.

Image credits: pinterest
Marathi

स्क्रबिंग – आठवड्यातून दोनदा

पावसात त्वचेला मृत पेशी हटवणं खूप महत्त्वाचं असतं. स्क्रब केल्याने त्वचेला नैसर्गिक चमक मिळते. घरी बेसन, मध आणि साखर मिसळून नैसर्गिक स्क्रबही बनवू शकता.

Image credits: pinterest
Marathi

मॉइश्चरायझर वापरणं विसरू नका

हवामान दमट असलं तरी त्वचेच्या आतली आर्द्रता टिकवणं आवश्यक असतं. त्यामुळे हलकं आणि वॉटर-बेस्ड मॉइश्चरायझर वापरा जेणेकरून त्वचा कोरडी होणार नाही.

Image credits: pinterest
Marathi

सनस्क्रीन वापरणं अत्यावश्यक

पावसात उन्हं दिसत नसली तरी UVA/UVB किरणं त्वचेला हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे कमीत कमी SPF 30 असलेलं सनस्क्रीन घराबाहेर पडण्याआधी नक्की लावा.

Image credits: pinterest
Marathi

आहार आणि पाणी यावर लक्ष ठेवा

आरोग्यदायी त्वचेसाठी फक्त बाह्य उपाय नाही तर भरपूर पाणी पिणं, फळं-भाज्या खाणं आणि तळकट अन्न टाळणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे.

Image credits: pinterest

ब्लॅक कॉफीचे फायदे काय आहेत, आरोग्यासाठी आहे लाभदायक

Neem Besan Haldi Face Pack : नीम-बेसन & हळद फेस पॅक कसा वापरावा? जाणून घ्या योग्य पद्धत

How to soften Stale chapati : शिळी पोळी प्रेशर कुकरमध्ये गरम करा, पुन्हा होईल ताजी!

तुळशीची वाढ थांबली?, पानं झाली पांढरी?; अशी घ्या काळजी की महिन्याभरात बहरेल तुळस!