उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी हलका आहार आवश्यक असतो. त्यामुळे तूप, मसाले आणि तळकट पदार्थ कमी वापरून स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पनीर भाजी बनवता येईल.
पनीर – २०० ग्रॅम, चौकोनी तुकडे, टोमॅटो – २ मध्यम, पेस्ट करून, कांदा – १ मध्यम, बारीक चिरून, हिरवी मिरची – २, बारीक चिरून, आले-लसूण पेस्ट – १ टीस्पून, हळद – १/२ टीस्पून
पॅनमध्ये लोणी किंवा तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची टाका. कांदा गुलाबीसर झाला की त्यात आले-लसूण पेस्ट घाला आणि परता.
नंतर टोमॅटो पेस्ट, हळद, तिखट, धणे-जिरे पावडर आणि मीठ घालून ५ मिनिटे शिजवा. तयार मिश्रणात पनीरचे तुकडे आणि थोडे पाणी घालून ३-४ मिनिटे मंद आचेवर शिजवा.
शेवटी गरम मसाला आणि कोथिंबीर टाका. ही हलकी आणि चविष्ट पनीर भाजी गरम फुलक्यासोबत किंवा जीरा राईससोबत खायला द्या
दह्याशिवाय तयार करा चविष्ट कढी, वाचा खास रेसिपी
वापरलेली चहा पावडर फेकून देता? टॅनिंग हटवण्यासाठी असा करा वापर
तापट स्वभावाच्या असतात या 5 राशींच्या व्यक्ती, चुकूनही वाद घालू नका
आठवड्याभरात शरीरावरील चरबी होईल कमी, प्या हे 2 खास ड्रिंक्स