घरच्या घरी पनीरची भुर्जी कशी बनवावी, कृती जाणून घ्या
Lifestyle Feb 17 2025
Author: vivek panmand Image Credits:Freepik
Marathi
साहित्य
२०० ग्रॅम पनीर, १ मध्यम आकाराचा कांदा, १ मध्यम टोमॅटो, १-२ हिरव्या मिरच्या, १ चमचा आले-लसूण पेस्ट, १/२ चमचा हळद, १/२ चमचा लाल तिखट, १/२ चमचा गरम मसाला, १/२ चमचा जिरे
Image credits: Freepik
Marathi
कांदा परतून घ्या
एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे टाका. त्यात आले-लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरच्या घालून परता. नंतर चिरलेला कांदा टाकून तो सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
Image credits: Freepik
Marathi
पनीर शिजवून घ्या
टोमॅटो घालून थोडा मऊ होईपर्यंत शिजवा. हळद, तिखट, धणे पूड, आणि गरम मसाला घालून चांगले मिक्स करा. आता पनीर टाकून व्यवस्थित मिक्स करून २-३ मिनिटे शिजवा.
Image credits: Freepik
Marathi
चवीनुसार कोथिंबीर टाकून घ्या
चवीनुसार मीठ घालून शेवटी कोथिंबीर टाका.
Image credits: Freepik
Marathi
सर्व्हिंग
गरमागरम पनीर भुर्जी पराठा, चपाती किंवा ब्रेडसोबत सर्व्ह करा. लिंबाचा रस घालून अधिक चविष्ट बनवा.