शिळ्या चपात्यांचा मसाला पोहे कसे बनवावेत, कृती जाणून घ्या
Lifestyle Feb 10 2025
Author: vivek panmand Image Credits:Freepik
Marathi
लागणारे साहित्य
३-४ शिळ्या चपात्या, १ मध्यम कांदा, १ मध्यम टोमॅटो, १ हिरवी मिरची, ५-६ कढीपत्ता पाने, १/२ चमचा मोहरी, १/२ चमचा जिरे, १/४ चमचा हळद, १/२ चमचा लाल तिखट, १/२ चमचा धणे-जिरे पावडर मीठ
Image credits: Freepik
Marathi
चपात्या तयार करणे
शिळ्या चपात्या हाताने लहान लहान तुकड्यांमध्ये तोडा. नंतर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. हे तयार केलेले चपाती पोह्यासारखे मिश्रण बाजूला ठेवा.
Image credits: social media
Marathi
फोडणी तयार करणे
एका पॅनमध्ये २ चमचे तेल गरम करा. त्यात मोहरी, जिरे आणि कढीपत्ता टाका. नंतर हिरवी मिरची आणि शेंगदाणे घालून परता. कांदा घालून तो थोडा गुलाबीसर होईपर्यंत परता.
Image credits: Freepik
Marathi
चपाती पोहा शिजवणे
नंतर हळद, लाल तिखट, मीठ आणि धणे-जिरे पावडर टाका. व्यवस्थित मिसळून त्यात वाटलेले चपातीचे तुकडे घाला. चांगले हलवा आणि झाकण ठेवून २ मिनिटे वाफ द्या.
Image credits: social media
Marathi
सर्व्ह करणे
वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. गरमागरम चपाती पोहा प्लेटमध्ये काढून सर्व्ह करा. सोबत चहा किंवा ताक असेल तर अजून स्वादिष्ट लागेल.
Image credits: Freepik
Marathi
टीप
कुरकुरीतपणा आणायचा असेल तर चपातीचे तुकडे परतून नंतर मिक्स करा. स्वाद वाढवण्यासाठी त्यात बारीक चिरलेला सिमला मिरची किंवा गाजर घालू शकता. लहान मुलांसाठी चीज टाकून देऊ शकता.