Marathi

घरच्याघरी तूप पटकन कसे बनवावे, माहिती जाणून घ्या

Marathi

साहित्य

१ लिटर साजूक दूध (गाईचे किंवा म्हशीचे), दूधाची साय (२-३ दिवस गोळा केलेली), थोडेसे पाणी

Image credits: Pinterest
Marathi

दूध तापवून साय गोळा करणे

रोज दूध तापवून त्यावर साय येऊ द्या. ती साय काढून एखाद्या डब्यात साठवा आणि फ्रीजमध्ये ठेवा. साधारण ४-५ दिवस साय गोळा झाल्यावर ती तूप बनवण्यासाठी तयार होते.

Image credits: Pinterest
Marathi

लोणी काढणे

साठवलेली साय एका मोठ्या भांड्यात घ्या. त्यात थोडेसे थंड पाणी टाका आणि रवी/बलेंडरने फेसा (गंठाळ्यासाठी घुसळा). काही मिनिटांत लोणी आणि ताक वेगळे होईल. 

Image credits: Pinterest
Marathi

लोणी तापवून तूप बनवणे

कढईत लोणी गरम करा आणि मंद आचेवर तापवा. हळूहळू लोणीतून पाणी उडून जाईल आणि त्याचा रंग बदलू लागेल. काही वेळाने सोनेरी रंगाचे तूप दिसू लागेल आणि तळाशी तुपाचे पोष्टिक कण साठतील.

Image credits: Pinterest
Marathi

तूप गाळून साठवणे

तूप गाळण्यासाठी स्टील चाळणी किंवा मलमलचे कपडे वापरा. गाळलेले तूप काचेच्या बरणीत किंवा स्टीलच्या डब्यात साठवा. तूप खोलीच्या तापमानाला आल्यानंतर झाकण लावा.

Image credits: Pinterest

हातात सोने घालण्याचे कोणते फायदे आहेत?

उन्हाळ्यात चेहऱ्याची कोणती काळजी घ्यावी, पद्धत जाणून घ्या

महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? घ्या जाणून

सांसद प्रवेश वर्मा यांची कन्या सनिधि: शिक्षण ते जीवनशैली