साबुदाणा – १ कप (भिजवलेला), बटाटे – २ उकडलेले, शेंगदाणे – अर्धा कप भाजून कुटलेले, हिरव्या मिरच्या – २ ते ३, मीठ – चवीनुसार, जिरं, कोथिंबीर, लिंबूरस
भिजवलेला साबुदाणा, बटाटे, शेंगदाणे, मिरच्या, मीठ, जिरं आणि कोथिंबीर एकत्र करून छान मळून घ्या. छोटे गोळे करून त्याचे वडे आकार द्या.
कढईऐवजी अप्पे पॅन वापरा. प्रत्येक खळग्यात थोडं तेल घाला. वडे ठेवून झाकण ठेवा आणि मंद आचेवर शिजवा. दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
तळलेल्या वड्यांपेक्षा तेल खूपच कमी लागते. पचायला हलके आणि चवदार लागतात. उपवासासाठी उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय आहे.
कमी तेलात बनवलेले साबुदाणा वडे हे आरोग्यदायी, चविष्ट आणि कुरकुरीत असतात. आता उपवासाचा बेत करताना तेलकटपणाची चिंता न करता हे वडे जरूर करून बघा!
दुर्गा पूजेच्या दुसऱ्या दिवशी नेसा लाल रंगातील या साड्या, दिसाल सुंदर
नवरात्रीचा पहिला दिवस रंग पांढरा, ट्राय करा हे सलवार सूट
Navratri 2025 : घटस्थापनेचे मित्रपरिवाराला पाठवा दुर्गा मातेचे मेसेज
Sarva Pitru Amavasya 2025 : पितरांना कसे प्रसन्न करावे? मुहूर्त, उपाय आणि दान-धर्म!