कुरकुरीत फ्रेंच फ्रीज घरच्या घरी कसं बनवायचं, प्रोसेस घ्या जाणून
Lifestyle Jan 09 2026
Author: vivek panmand Image Credits:freepik
Marathi
योग्य बटाट्यांची निवड
फ्रेंच फ्राईजसाठी मोठे व स्टार्च जास्त असलेले बटाटे वापरणे महत्त्वाचे आहे. अशा बटाट्यांमुळे फ्राईज बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ होतात. लहान किंवा पाणचट बटाटे टाळा.
Image credits: freepik
Marathi
बटाटे कापण्याची योग्य पद्धत
बटाटे सोलून सारख्या जाडीचे लांबट काप करा. सगळे काप एकसारखे असतील तर फ्राईज एकसारख्या शिजतात. जाड काप असतील तर आतून मऊ असतात. पातळ काप असतील तर जास्त कुरकुरीत होऊन जातात.
Image credits: freepik
Marathi
स्टार्च काढणे का गरजेचे?
कापलेले बटाटे थंड पाण्यात 30 मिनिटे भिजत ठेवा. पाणी पांढरे दिसू लागले तर ते बदलून पुन्हा भिजवा. जादा स्टार्च निघून जातो. फ्राईज चिकटत नाहीत. कुरकुरीतपणा वाढत जातो.
Image credits: freepik
Marathi
थोडे उकळून घेणे
एका भांड्यात पाणी उकळवा, त्यात मीठ आणि १ टीस्पून व्हिनेगर घाला. बटाटे 5–6 मिनिटे उकळा. आतून मऊ होतात, बाहेरून तुटत नाहीत आणि फ्राईजची शेप टिकून राहते.
Image credits: freepik
Marathi
बटाटे नीट कोरडे करा
उकळलेले बटाटे गाळून स्वच्छ कापडावर किंवा टिश्यूवर पसरवा. किमान 10–15 मिनिटे कोरडे होऊ द्या. ओलसर बटाटे तेल शोषतात. कोरडे बटाटे कुरकुरीत होतात
Image credits: freepik
Marathi
फ्रेंच फ्राईज कसे तळून घ्यायचे?
मध्यम आचेवर तेल गरम करा. बटाटे थोडेथोडे करून फक्त शिजेपर्यंत तळा. पहिल्या तळणीनंतर फ्राईज थंड होऊ द्या. नंतर तेल जास्त तापवून पुन्हा तळा.