बनावट औषधांमुळे आजार वाढण्यासह जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो. अशातच बनावट औषधे ओळखण्यासाठी काही खास टिप्स पुढे जाणून घेऊया.
चुकीचे स्पेलिंग, पाकिटावरील प्रिंटिंग, तुटलेली सील किंवा असामान्य पॅकेजिंग याकडे व्यवस्थितीत लक्ष द्या. अशी औषधणे बनावट असू शकतात.
औषधाच्या बॉक्स आणि स्ट्रिपवर बॅच नंबर, उत्पादन आणि एक्सपायरी तारीख जुळल्या पाहिजेत. यामध्ये फरक दिसल्यास ती औषधे खरेदी करू नका.
काही औषधांवर विशिष्ट कोड असतो जो स्कॅन करून तुम्ही कंपनीकडून त्याची खरी माहिती मिळवू शकता.
विश्वसनीय मेडिकल स्टोअरमधूनच औषधे खरेदी करा आणि नेहमी बिल घ्या. बनावट औषधे विक्रेते बहुतेकदा बिल देत नाहीत.
जर औषधाचा रंग बदलला असेल किंवा त्यात विचित्र वास येत असेल तर लगेच सावध व्हा.
जर तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर खऱ्या पॅकचा फोटो पाहिला तर सर्व स्पष्ट होईल. CDSCO.gov.in साइटवरही औषधांची तपासणी करता येते.
जर कोणत्याही औषधावर तुम्हाला जराही संशय असेल तर स्थानिक औषध निरीक्षक किंवा CDSCO पोर्टलवर तक्रार करा.
फक्त ₹250 मध्ये 2-in-1 लुक, साडी-जीन्ससोबत उठून दिसतील हे क्रॉप टॉप्स, एकदा ट्राय करा
उन्हापासून होईल बचाव + मिळेल स्टायलिश लुक, ट्राय करा या ट्रेंडी कॅप्स
ब्लाउजला द्या स्टायलिश लुक, बॅक नेकसाठी निवडा युनिक दोरी डिझाइन
Chanakya Niti: हे ४ गुण असतील तर तुम्हाला यश थांबवू शकणार नाही!