धूळ, प्रदूषण आणि ताणतणावामुळे त्वचेचा नैसर्गिक ग्लो कमी होतो. नियमित फेशियल केल्याने त्वचा स्वच्छ, तजेलदार आणि चमकदार दिसायला मदत होते.
सर्वप्रथम सौम्य फेसवॉशने चेहरा नीट धुवा. मेकअप असल्यास तो पूर्ण काढून टाका. स्वच्छ त्वचेवर फेशियल केल्यास त्याचा जास्त फायदा होतो.
गरम पाण्याची वाफ ५–७ मिनिटे घ्या. यामुळे त्वचेतील मळ बाहेर पडतो आणि ब्लॅकहेड्स कमी होण्यास मदत होते. संवेदनशील त्वचा असल्यास वेळ कमी ठेवा.
साखर + मध किंवा ओट्स पावडर + दूध मिसळून हलक्या हाताने स्क्रब करा. यामुळे मृत त्वचा निघून जाते आणि त्वचा मऊ होते.
फेशियलनंतर योग्य मॉइश्चरायझर लावा. यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि नैसर्गिक ग्लो टिकून राहतो.
सिंपल-सोबर लूकमध्ये खुलेल सौंदर्य, ट्राय करा श्रीलालाच्या हेअरस्टाइल
Baby Hairs असे करा सेट, केसांना लावा हे 4 प्रोडक्ट्स
पायांना येईल चमक, 2K मध्ये खरेदी करा या डिझाइन्सचे अँकलेट
लहान डोळ्यांचे खुलेल सौंदर्य, ट्राय करा कृती सेननसारखा Eye Makeup