घनदाट केसांसाठी फायदेशीर शिकेकाई, घरच्याघरी असा तयार करा Shampoo
Lifestyle Mar 05 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social media
Marathi
शिकेकाई शॅम्पू
काळेभोर, लांबसडक आणि घनदाट केसांसाठी वेगवेगळ्या ट्रिटमेंट केल्या जातात. पण मजबूत केसांसाठी घरच्याघरी शिकेकाई शॅम्पू कसा तयार करायचा हे जाणून घेऊया.
Image credits: Social media
Marathi
शिकेकाईमधील पोषण तत्त्वे
शिकेकाईमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमीन ई सह के आणि अँटीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे केसांना चमक येण्यास मदत होते.
Image credits: Social media
Marathi
शॅम्पूसाठी सामग्री
100 ग्रॅम शिकेकाई
20 ग्रॅम मेथी दामे
100 ग्रॅम रीठा
सुके आवळे
कढीपत्ता
कडुलिंब
रोजमेरी
Image credits: Social media
Marathi
एका भांड्यात पाणी द्या
शॅम्पू तयार करण्यासाठी एका भांड्यात 2 ग्लास पाणी घ्या.
Image credits: Social media
Marathi
शिकेकाई रात्रभर भिजवून ठेवा
पाण्यामध्ये शिकेकाई, आवळा, रीठा, मेथी दाणे, कढीपत्ता आणि कडुलिंबाची पाने घालून रात्रभर भिजत ठेवा.
Image credits: pinterest
Marathi
सामग्री पाण्यात उकळून घ्या
दुसऱ्या दिवशी सामग्री मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. दुसऱ्या बाजूला गॅसवर एका भांड्यामध्ये मिक्सरमधील सामग्री उकळून घ्या. यामध्येच रोजमेरीही घाला.
Image credits: unsplash
Marathi
शिकेकाईचा शॅम्पू
भांड्यामधील शॅम्पूचे पाणी उकळल्यानंतर गाळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरुन ठेवा. घरच्याघरी तयार करण्यात आलेला शिकेकाईचा शॅम्पू केसांना आठवड्यातून दोनदा लावा.
Image credits: pinterest
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.