विविध संशोधनांनुसार, ७० टक्के किंवा त्याहून अधिक कोको असलेलं डार्क चॉकलेट योग्य प्रमाणात खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे मिळतात.
डार्क चॉकलेट ब्लड प्रेशर कमी करायला मदत करतं. यामध्ये भरपूर प्रमाणात फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलीफिनॉल्स असतात, जे हृदयासाठी खूप फायदेशीर ठरतात.
डार्क चॉकलेटमधील कोको फ्लेव्हॅनॉल, थिओब्रोमाईन आणि कॅफीन मेंदूतील रक्तप्रवाह वाढवतात. यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढायला मदत होते.
डार्क चॉकलेट शरीरात एंडोर्फिन, सेरोटोनिन आणि डोपामाईन हार्मोन्स तयार करायला मदत करतं. हे हार्मोन्स मूड चांगला ठेवतात आणि नैराश्य दूर करतात.
डार्क चॉकलेटमधील अँटीऑक्सिडंट्स सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचं संरक्षण करतात. हे त्वचेचा ओलावा टिकवून ठेवतं आणि कोलेजन तयार करायला मदत करतं.
डार्क चॉकलेटमध्ये कॅफीन आणि थिओब्रोमाईनसारखे नैसर्गिक घटक असतात. हे घटक शरीराला झटपट ऊर्जा देण्याचं काम अगदी उत्तम प्रकारे करतात.
डार्क चॉकलेटमधील फायबर आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियांची वाढ करायला मदत करतं. यामुळे पचनशक्ती सुधारते आणि आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं.
Gold Anklet Designs: आजकालच्या मुलींना आवडणाऱ्या पैंजण डिझाईन्स.. पाहा किती सुंदर आहेत!
Skincare Tips : त्वचेसाठी काय जास्त फायदेशीर, हळद की बेसन?
Kitchen Hacks : नवीन भांड्यांवरचे स्टिकर्स एका सेकंदात काढण्याची सोपी ट्रिक
Jeera Water Benefits : रोज सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी पिताय?