कमी बजेटमध्ये तुम्हाला फॅन्सी आणि स्मार्ट मिनिएचर हँडबॅग्स निवडता येतात. तुम्ही या बॅग्ज पार्टी आणि ऑफिस अशा दोन्ही ठिकाणी वापरू शकता.
छोटे हँडल आणि स्ट्रक्चर्ड शेप असलेली ही बॅग फॉर्मल कपड्यांवर खूपच क्लासी दिसते. कॉलेज आणि ऑफिसला जाणाऱ्या मुलींमध्ये या बॅगची मोठी क्रेझ आहे.
हाफ-मून डिझाइनची ही बॅग सध्या फॅशन ट्रेंडमध्ये आहे. जीन्स, ड्रेस आणि कुर्ती अशा सगळ्यांवर ती स्टाईल करता येते. पण तिच्या पारंपरिक डिझाइनमुळे एथनिक लूकवर ती जास्त छान दिसेल.
लेदर पॅटर्न आणि गोल्ड टोन असलेली ही बॅग ऑफिस आणि पार्टी दोन्हीसाठी परफेक्ट मानली जाते. यामध्ये फोन, कार्ड आणि मेकअपच्या गरजेच्या वस्तू सहजपणे ठेवता येतात.
एथनिक लूकसाठी तुम्ही अशी फॅन्सी एम्ब्रॉयडरीवाली मिनी लटकन बॅग निवडू शकता. यातील मोती, स्टोन आणि एम्ब्रॉयडरी वर्कचं डिझाइन खूप सुंदर दिसतं. साडीसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
ही मिनी बकेट फ्रूट्स स्टाईल क्लच बॅग खूपच ट्रेंडी आणि युनिक दिसते. कॅज्युअल आणि सेमी-फॉर्मल अशा दोन्ही लूकवर ही छान दिसते. तुम्ही पार्टी वेअरवर ही बॅग ट्राय करू शकता.
वॉलेट आणि हँडबॅग यांचं कॉम्बिनेशन असल्यामुळे ही बॅग खूप प्रॅक्टिकल मानली जाते. ऑफिस पार्टी आणि डेट नाईटसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
लेदरसारखं टेक्सचर फिनिश असलेली ही हँडबॅग तुम्हाला लक्झरी, प्रीमियम लूक देईल. फॉर्मल मीटिंग, पार्टी अशा दोन्ही ठिकाणी कॅरी करण्यासाठी अशी लटकन वर्क सितारा मिनी बॅग बेस्ट ऑप्शन आहे.
जर तुम्हाला कमी बजेटमध्ये काहीतरी ट्राय करायचं असेल, तर तुम्ही असं सोबर पर्ल वर्क पोटली डिझाइन निवडू शकता. ही बॅग खूपच सुंदर दिसते. यावरील स्टोन आणि पर्ल वर्क खूपच आकर्षक दिसतं.