घरच्याघरी तयार करा कॅफेसारखे French Fries, वाचा रेसिपी
Lifestyle Feb 28 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:freepik
Marathi
फ्रेंच फ्राइज
लहान मुलांना फ्रेंच फ्राइस खूप आवडतात. यासोबत सॉस किंवा मेयॉनिज सर्व्ह केले जाते. घरच्याघरी कॅफेसारखे फ्रेंच फ्राइज कसे तयार करायचे याची रेसिपी पाहूया.
Image credits: freepik
Marathi
सामग्री
3 मोठ्या आकारातील बटाटे
तेल
मीठ चवीनुसार
चाट मसाला
लाल मिरची पावडर
कॉर्न फ्लोअर
Image credits: freepik
Marathi
बटाटे स्वच्छ धुवून कापून घ्या
सर्वप्रथम बटाटे व्यवस्थिती सोलून घ्या आणि लांब आकारात कापा. यानंतर बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर पाच मिनिटे पाण्यात ठेवा.
Image credits: freepik
Marathi
बटाटे उकडून घ्या
एका पॅनमध्ये पाणी गरम करा आणि त्यामध्ये लांब आकारात कापलेले बटाटे घाला. यावेळी पाण्यात मीठही घाला. बटाटे 3-4 मिनिटांसाठी मध्यम आचेवर उकळवून घ्या.
Image credits: freepik
Marathi
कढईत तेल गरम करा
बटाटे पाण्यातून काढून सुती कापडावर ठेवून सुकवा. एका कढईत तेल गरम करुन घ्या.
Image credits: freepik
Marathi
फ्रेंच फ्राइज तळून घ्या
तेल गरम झाल्यानंतर फ्रेंच फ्राइज कॉर्न फ्लोअरमध्ये घोळवून तळण्यासाठी तेलात सोडा. बटाट्यांना सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
Image credits: freepik
Marathi
सॉससोबत खाण्यासाठी सर्व्ह करा
फ्रेंच फ्राइज सॉस किंवा डिपसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.