मेथीमध्ये फायबर, प्रोटीन, लोह आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी वाढवण्यासाठी याचा खूप उपयोग होतो.
मेथीतील विरघळणारे फायबर कार्बोहायड्रेट्स पचण्याची प्रक्रिया संथ करतात. यामुळे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
स्तनदा मातांमध्ये दुधाची निर्मिती वाढवण्यासाठी मेथी खूप फायदेशीर ठरते. हे नैसर्गिकरित्या दूध ग्रंथींना उत्तेजित करण्याचं काम करतं.
तुम्ही रोज मेथीचं पाणी प्यायल्यास पोट फुगणे, बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास टळतो. तसेच, छातीत जळजळ होण्याची समस्याही यामुळे कमी होते.
मेथीचं पाणी शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल (LDL) आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करतं. यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारण्यास मोठी मदत मिळते.
मेथीमध्ये प्रोटीन आणि निकोटिनिक ॲसिड मुबलक प्रमाणात आढळतं. हे घटक केस गळती थांबवून केसांची निरोगी वाढ होण्यासाठी मदत करतात.
मेथीचं पाणी प्यायल्याने पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं. यामुळे तुम्ही अतिरिक्त कॅलरीज खाण्यापासून वाचता आणि वजन वेगाने कमी होण्यास मदत होते.
Kidney Health : रोज रात्री हे पेय पिण्याची सवय लावा, किडनी राहील एकदम निरोगी
Neer Dosa Recipe : तोंडात टाकताच विरघळणारा नीर डोसा, जाणून घ्या सोपी पद्धत
Jaggery Benefits: रोज थोडासा गूळ खाल्ला तर शरीरात काय बदल होतात माहितीये?
Hair Growth Tips : केस वाढवण्यासाठी 8 घरगुती आणि नैसर्गिक उपाय