Marathi

दररोज या एका चुकीमुळे शरीरात वाढू शकते Uric Acid

Marathi

युरिक अ‍ॅसिड म्हणजे काय?

आपल्या शरीरात तयार झालेले अनेक प्रकारचे केमिकल आणि टाकाऊ पदार्थ लघवीद्वारे बाहेर टाकले जातात. याच रसायनांपैकी एक युरिक अ‍ॅसिड आहे. खरंतर, प्युरिनच्या विघटनाने हे तयार होते.

Image credits: Getty
Marathi

असे होते आरोग्याचे नुकसान

युरिक अ‍ॅसिड शरीरातील रक्तात मिसळले जाते आणि याच्या शुद्धीकरणासाठी किडनीवर अधिक दबाव पडला जातो. यामुळे आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवू लागतात.

Image credits: Getty
Marathi

युरिक अ‍ॅसिडची लक्षणे

युरिक अ‍ॅसिड शरीरात वाढल्यास लघवीचा रंग बदलला जातो. याशिवाय लघवीमधून दुर्गंधी येऊ लागते. एवढेच नव्हे पायाचे अंगठे, टाचांमध्ये टोचल्यासारखे दुखण्यास सुरुवात होते.

Image credits: Getty
Marathi

का वाढते युरिक अ‍ॅसिड?

उच्च प्रोटीनचे अत्याधिक सेवन केल्याने किंवा प्युरीनचे प्रमाण अधिक वाढल्यास युरिक अ‍ॅसिड वाढले जाते. यावर वेळीच नियंत्रण मिळवणे आवश्यक असते.

Image credits: social media
Marathi

ही चुक करू नका

डेली रुटीनमध्ये कमी पाणी पित असाल तर शरीरातून टॉक्सिन्स बाहेर पडत नाहीत. यामुळे शरीरातील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढले जाऊ शकते आणि डिहाइड्रेटची समस्या उद्भवू शकते.

Image credits: Social media
Marathi

आजार

युरिक अ‍ॅसिड वाढल्याने क्रिस्टल तयार होतात, जे स्नायूंमध्ये जमा होऊ लागतात. यामुळे संधीवात आणि किडनी स्टोन होऊ शकतो.

Image credits: Getty
Marathi

खाण्यापिण्याकडे लक्ष

युरिक अ‍ॅसिड वाढलेले असल्यास आंबट पदार्थ किंवा उच्च प्रोटीन असणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे टाळावे.

Image credits: Pinterest
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Freepik

Chanakya Niti: प्रत्येक व्यक्तीसोबत असतात हे 3 शत्रू, जाणून घ्या त्यापासून कसे वाचावे?

उन्हाळ्यात दिसाल सुंदर & स्टायलिश!, घाला स्लीव्हलेस कॉटनचा सलवार सूट

बिना कापता किंवा न चाखता, या सोप्या ट्रिकने ओळखा गोड तरबूज!

दिवसातून कितीवेळा फेसवॉश करावा?