Marathi

दिवसभर एनर्जी टिकवून ठेवायचीय? या ६ सवयी नक्की फॉलो करा

तुम्हालाही दिवसभर फ्रेश आणि एनर्जेटिक राहायचंय? मग तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये या ६ सोप्या गोष्टींचा नक्की समावेश करा.

Marathi

झोपेतून अचानक उठणे टाळा

तुम्ही सकाळी डोळे उघडताच झटक्यात बिछान्यातून उठण्याची सवय टाळा. अचानक उठल्याने तुमच्या स्नायूंवर आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त ताण पडतो.

Image credits: Getty
Marathi

अलार्म 'स्नूझ' करण्याची सवय सोडा

तुम्ही अलार्म वाजल्यावर तो वारंवार 'स्नूझ' करणे टाळा. यामुळे तुमच्या झोपेचे चक्र बिघडते आणि तुम्हाला दिवसभर मानसिक थकवा जाणवू शकतो.

Image credits: Getty
Marathi

स्ट्रेचिंग, दीर्घ श्वास किंवा ध्यान करा

तुम्ही सकाळी उठल्याबरोबर थोडे स्ट्रेचिंग, दीर्घ श्वासोच्छ्वास किंवा ध्यान करण्याची सवय लावा. यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश आणि उत्साही राहाल.

Image credits: Getty
Marathi

उठल्याबरोबर मोबाईल पाहणे टाळा

तुम्ही सकाळी उठल्याबरोबर लगेच हातात फोन घेण्याची सवय सोडा. झोपेतून उठताच नोटिफिकेशन्स किंवा सोशल मीडिया पाहिल्याने विनाकारण मानसिक ताण वाढतो.

Image credits: Getty
Marathi

रिकाम्या पोटी चहा पिणे टाळा

तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय आजच सोडा. यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडते आणि ॲसिडिटीचा त्रास वाढू शकतो.

Image credits: freepik
Marathi

नाश्ता कधीही चुकवू नका

तुम्ही सकाळचा नाश्ता कधीही टाळू नका. नाश्ता न केल्याने लठ्ठपणा, टाईप २ मधुमेह आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्यासारख्या समस्यांचा धोका वाढतो.

Image credits: Getty

Blouse Front Designs : सिल्क साडीवर ट्राय करा हे सुंदर ब्लाऊज फ्रंट डिझाईन्स

Coconut Milk : नारळाच्या दुधाची कमाल, केस वेगाने वाढतील

Bangle Designs : साडीवर तुमचा लूक आणखी खुलवणाऱ्या बांगड्यांचे डिझाईन्स

Walnut Health Benefits : रोज मूठभर अक्रोड खाण्याचे 7 जबरदस्त फायदे