कढीपत्ता चेहऱ्यासाठी फायदेशीर असते. कढीपत्त्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने इन्फेक्शनच्या समस्येपासून दूर राहता. याशिवाय व्हिटॅमिन ए आणि सी असल्याने त्वचा हेल्दी होते.
चेहऱ्यावर पिंपल्स आले असल्यास कढीपत्त्याच्या पानांची पेस्ट तयार करून त्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा. पेस्ट चेहऱ्याला 10 मिनिटे लावून स्वच्छ पाण्याने फेस पॅक धुवा.
चेहऱ्यावरील डागांची समस्या दूर करण्यासाठी कढीपत्त्याची पेस्ट 10 मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवा. यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
हळदीत अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असल्याने चेहऱ्यावरील घाण काढून पोर्स स्वच्छ करतात. यामध्ये कढीपत्त्याची पेस्ट मिक्स करुन फेस पॅक तयार करा.
त्वचेवर रॅशेज आले असल्यास कढीपत्त्याच्या पेस्टचा वापर करू शकता. यामुळे हळूहळू रॅशेजची समस्या कमी होईल.
चेहरा टवटवीत दिसण्यासाठी कढीपत्त्याच्या पेस्टमध्ये गुलाब पाणी मिक्स करा. पेस्ट चेहऱ्याला 15 मिनिटे लावून ठेवल्यानंतर स्वच्छ धुवा.