माइक्रोव्हेवमध्य एखादा पदार्थ गरम केल्यानंतर त्याचे ठिपके उडले जातात. यामुळे कालांतराने माइक्रोव्हेव आतमधून चिकट होते. अशातच माइक्रोव्हेव स्वच्छ करण्यासाठी पुढील काही ट्रिक्स पाहू.
मायक्रोव्हेवची स्वच्छता करण्यासाठी सर्वप्रथम स्विच बंद करुन प्लग काढून घ्या. मायक्रोव्हेव थंड झाल्यानंतरच स्वच्छ करा.
एका मायक्रो सेफ बाउलमध्ये थोडे पाणी भरा. यामध्ये अर्धा लिंबू कापून टाका. यानंतर पाणी गरम करा आणि यामधून निघणाऱ्या वाफेनंतर स्क्रबरने मायक्रोव्हेव स्वच्छ करा.
1 कप पाण्यात चार चमचे बेकिंग सोडा, व्हाइट व्हिनेगर टाका. यानंतर पाच मिनिटे गरम करुन 10-15 मिनिटे मायक्रोव्हेवमध्ये ठेवल्यानंतर एका कापडाने स्वच्छ करा.
मायक्रोव्हेवच्या बाहेरील काच किंवा आजूबाजूचा भाग स्वच्छ करु शकता. यासाठी लिक्विड सोपचे पाणी वापरुन स्क्रबरने स्वच्छ करा.
मायक्रोव्हेवट्या आतमधील प्लेटची स्वच्छता करण्यासाठी तो सर्वप्रथम बाहेर काढून घ्या. यानंतर सामान्य पाण्याने बंद करुन लिक्विड सोपने वॉश करुन सुकल्यानंतर मायक्रोव्हेवमध्ये ठेवा.
मायक्रोव्हेच्या कोपऱ्यातील घाण काढण्यासाठी लिक्विड सोपनंतर जुन्या ब्रशने ते स्वच्छ करा.