Chanakya Niti: अपमानाचा बदल कसा घ्यावा, चाणक्य सांगतात
Lifestyle Jun 03 2025
Author: vivek panmand Image Credits:chatgpt AI
Marathi
अपमान झाला तर? रागाने नाही, युक्तीने उत्तर द्या!
चाणक्य म्हणतात, "रागात दिलेलं उत्तर हे तुमच्या दुर्बलतेचं लक्षण असतं. संयम ठेवून दिलेलं उत्तर हे तुमचं सामर्थ्य दाखवतं."
Image credits: AI
Marathi
संयम म्हणजे दुर्बलता नाही, तर यशाची पहिली पायरी
चाणक्यांच्या मते, "जो अपमान सहन करतो, तो कमजोर नाही तर योग्य क्षणाची वाट पाहणारा रणनीतीकार असतो." तुमचं शांत राहणं म्हणजे तुमचं दुर्बल असणं नाही, तर तुमचा आत्मनियंत्रणाचा विजय असतो
Image credits: chatgpt AI
Marathi
वेळेची वाट योग्य तयारीसह बघा
चाणक्य नीती सांगते – "शत्रू हसतो तेव्हा शांत रहा. कारण जेव्हा तुम्ही यशस्वी होता, तेव्हा संपूर्ण जग स्तब्ध होतं." तुमचं यश म्हणजेच तुमच्या अपमानाचं सर्वात सडेतोड उत्तर आहे.
Image credits: Getty
Marathi
सूड नको, स्वतःमध्ये 'बदल' हवा
खरं बदला म्हणजे दुसऱ्याला त्रास देणं नाही, तर स्वतःला इतकं प्रगल्भ, यशस्वी आणि कणखर बनवणं की, तुम्ही हसून अपमानाचा इतिहास पुसून टाकाल.
Image credits: pinterest
Marathi
ज्ञान, कौशल्य आणि आत्मविश्वास – हाच खरा बदलाचा शस्त्र
चाणक्य यांचा स्पष्ट सल्ला होता – "कुणी तुम्हाला कमी लेखलं असेल, तर त्यांना शिक्षा द्या – पण आपल्या यशाने." नवीन कौशल्ये शिका, स्वतःवर मेहनत घ्या.
Image credits: pinterest
Marathi
मौन हे सर्वात मोठं उत्तर आहे
"शब्द नाही, यश बोलू द्या." आपण रागाने प्रतिक्रिया देतो तेव्हा आपण आपली उंची कमी करतो. पण जर आपण मौन बाळगून, यशस्वी झालो, तर तुमचं मौनच लोकांचं मन बदलून टाकतं.
Image credits: pinterest
Marathi
रणनीती आणि वेळ – दोन्ही तुमच्या बाजूने असू द्या
चाणक्य सांगतात – "धैर्याने चालणारा माणूसच रणात विजय मिळवतो." त्यामुळे आक्रमक नव्हे, तर समंजस बना. वेळ योग्य असेल, तर उत्तर द्या – पण ते ‘रागाने’ नव्हे, ‘परिणामाने’.