चाणक्य म्हणतात की, पती-पत्नीमध्ये परस्पर आदर आणि प्रेम असणे अत्यावश्यक आहे. एकमेकांबद्दल आदर असेल तर संसारातील अडचणी सहज सोडवता येतात.
चांगला संवाद सुखी संसाराचा पाया असतो. पतीने आणि पत्नीनं एकमेकांचे मत ऐकून, एकमेकांना समजून घेतले पाहिजे.
संसारात अनेकदा अडचणी येतात. अशा वेळी दोघांनीही धैर्याने आणि संयमाने परिस्थिती हाताळली पाहिजे. चाणक्याच्या मते, अशांत किंवा उतावळ्या स्वभावामुळे समस्या वाढतात.
चाणक्याच्या मते, पतीने नेहमी पत्नीचा सन्मान केला पाहिजे. जर पत्नीचा सन्मान केला तर ती अधिक विश्वासू व समर्पित राहते, ज्यामुळे संसार सुखकर होतो.
संसारात आर्थिक शिस्त आणि स्थैर्य असणे महत्त्वाचे आहे. चाणक्य म्हणतात की, पतीने आपल्या कुटुंबाचे आर्थिक व्यवस्थापन जबाबदारीने करावे.
चाणक्याच्या मते, संसारातील वाद किंवा गुपित गोष्टी इतरांना सांगू नयेत. अशा गोष्टी गुप्त ठेवल्यास संसारातील विश्वास टिकून राहतो.
पत्नीच्या चुका किंवा दोष याबद्दल सार्वजनिकपणे किंवा सतत निंदा करू नका. यामुळे विश्वास कमी होतो आणि नात्यात ताण निर्माण होतो.