आचार्य चाणाक्य यांच्या मते, कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवण्याआधी त्याला चार निकषांवर तपासून घ्यावे. त्यानंतरच त्याच्यावर विश्वास ठेवावा. जाणुन घ्या कोणते आहेत ते चार निकष
यथा चतुर्भिः कनकं परीक्ष्यते निर्घषणच्छेदन तापताडनैः। तथा चतुर्भिः पुरुषः परीक्ष्यते त्यागेन शीलेन गुणेन कर्मणा॥
आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या प्रमाणे घासल्याने, कापल्याने, तापवल्याने आणि आपटल्याने सोन्याची पारख होते, त्याचप्रमाणे त्याग, शील, गुण आणि कर्माने व्यक्तिची परीक्षा होते.
आचार्य चाणक्य यांच्या मते, जी व्यक्ति इतरांच्या सुखासाठी आपल्या सुखाचा त्याग करते त्याच्यावर विश्वास ठेवावा. असे लोक दुसऱ्यांच्या आनंदाला आपल्या सुखापेक्षा जास्त महत्व देतात.
व्यावहारीक ज्ञान आणि पवित्रता म्हणेज शील होय. याचा अर्थ जो व्यक्ती कोणत्याही व्यवहारात निपुण असतो आणि पवित्र आचरण करतो, त्याच्यावर विश्वास ठेवावा
आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या लोकांमध्ये क्रोध, आळस, स्वार्थ, अहंकार या सारखे दुर्गुण नाहीत त्यांच्यावर विश्वास ठेवावा. जो सत्यासोबत असतो त्याच्यावर विश्वास ठेवावा.
जो व्यक्ति मेहनत आणि ईमानदारीने काम करतो व आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करतो, चुकीचे काम करत नाही त्याच्यावर विश्वास ठेवावा